संध्याकाळी दीपाताईचा फोन आला की अपूर्वला ताबडतोब ससूनमध्ये दाखल करावं लागेल. त्यावेळी प्रियदर्शन, टाकळकर सर आणि मी एमकेसीलच्या फिनिशींग स्कूलमध्येच होतो. टाकळकर सरांच्या गाडीतूनचं अपूर्वला ससूनमध्ये घेऊन जायचं असं ठरलं. सर, पीडी आणि मी दीपाताईकडे निघालो.
अपूर्व दोन दिवसांपासूनच तापाने आजारी होता. ताप कमी होण्याची काही चिन्हं दिसतं नव्हती. इतर सर्व चाचण्या दोषविरहीत आल्यानंतर डॉक्टरांनी ससूनमध्ये जाऊन स्वाईन-फ्लूची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. अपूर्वला बहुधा स्वाईन-फ्लू असावा. दीपाच्या घरी पोहचलो. अपूर्वला गाडीत बसवलं. सर, दीपाताई, अपूर्व आणि मी, सरांच्या गाडीतून ससूनच्या दिशेने निघालो. पीडी मागाहून त्याच्या गाडीहून येणार होता. दरम्यानच्या काळात पीडी आणि मी ससूनमध्ये आपलं कुणी ओळखीचं आहे का याचा विचार करू लागलो. ससूनच्या अवाढव्य सरकारी पसार्यायमध्ये आपली दाद लागणं शक्य नाही हे आम्हाला माहीतं होतं. पीडीने त्याचा मावसभाऊ सुरुतला फोन केला. त्याची होणारी बायको, राखी ससूनमध्ये इंटर्नशीप करत होती. सुरुत स्वतःसुद्धा डॉक्टर आहे. गाडीत असतानाचं, पीडीचा फोन आला आणि दोन गोष्टी कळाल्या. पहिली म्हणजे की, राखी आज ससूनमध्ये नाही आहे, पण तिची मैत्रिण मोनाली सध्या तिथे आहे आणि दुसरी म्हणजे ससूनमध्ये स्वाईन-फ्लूच्या रुग्णांना सरळ casualty विभागात घेऊन जावं लागतं.
आम्ही ससूनच्या मुख्य दरवाज्याने गाडी आत घेतली. मी आणि दीपा अपूर्वसह उतरलो व casualty विभागची चौकशी केली. सर गाडी पार्क करून येत होते. तिथे वॉचमनसह सर्व जनता तोंडाला रुमाल आणि मास्क लावून होती. मनातून थोडा दचकलोच. आतापर्यंत माध्यमांनी कसा स्वाईन-फ्लूचा बाजार मांडला आहे असं जरी म्हणत आलो होतो तरी तिथे काही क्षण स्वाईन-फ्लूचीभिती वाटली. शेवटी पुण्यातल्या स्वाईन-फ्लूच्या पंढरीच्या casualty विभागात उभा होतो. पण नंतर लगेचच विचार केला, जो होगा वो देखा जायेगा। फ्क्त प्राथमिक सुरक्षिततेसाठी तोंडाला रुमाल बांधला. डॉ. मोनाली यांच्याशी बोललो, त्यांनी आम्हाला थोडा वेळ बसावयास सांगितले.
अचानक मला किर्तीसुधाची आठवण आली. काही दिवसांपूर्वीच ती एमकेसीलमध्ये आली होती, तेंव्हा तिने म्हटलं होत की ती ससूनमध्ये काहीतरी कारणासाठी जाते. लगेचच मी तिला फोन केला व ससूनमध्ये मी असल्याचं सांगितलं. ती रूमवर जायला निघणारचं होती, ती ससूनकडे फिरकली. तिने तिथे आल्यावर सांगितलं की डॉ. धरवसुद्धा इथेचं ससूनमध्ये तिसर्यात मजल्यावर आहे. धरवला मी सर्चमध्ये भेटलो होतो, तो सर्चमध्ये तंबाखूच्या व्यसनमुक्तीवर काम करत होता. फोनकेल्यावर धरव तिथे पाचच मिनिटांत आला. धरव डॉक्टरांशी अपूर्वविषयी सविस्तर बोलला, तेंव्हा कळलं की काळजी करण्याचं काहीचं कारण नाही आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टरांनी अपूर्वला ऍडमीट करण्याचा सल्ला दिला.
अपूर्वला दुसर्याी मजल्यावर वॉर्ड्मध्ये नेईपर्यंत सुरुत व राखी दोघेही तिथे आले होते. तरु, धरवची बायको जी ससूनमध्येच डॉक्टर आहे, ती सुद्धा तिथे आली होती. आतापर्यंत तिथलं सगळं चित्रचं पालटून गेलं होतं. अर्ध्यातासापूर्वी याच ससूनमध्ये आता करायचं काय? या प्रश्नाने आम्हाला छळलं होतं. आता तर वॉर्ड्मध्ये आम्ही चक्क गप्पा मारत होतो, एकमेकांचे मोबाईल नंबर घेत होतो. डॉक्टरांची नुसती फौज होती बरोबर. थोड्यावेळाने, वैभव आगवणे आणि त्याचा मित्र उमेश तिथे आले. दोघेसुद्धा ससूनमध्ये इंटर्नशीप करत होते. (नंतर गप्पांमध्ये कळलं की उमेश नुकताच स्वाईन-फ्लू मधून ठणठणीत बरा झाला होता आणि आता आम्हाला अभिमानाने सांगत होता की आता मला स्वाईन-फ्लू कधीच होणार नाही. त्यामुळे स्वाईन-फ्लूची उरली-सुरलीशी भितीसुद्धा निघून गेली.) ”अरे आपले निर्माणचे वैभव चाकूरकर आणि किरणसुद्धा बाजूच्याच बी.जे. मेडीकलमध्येच आहेत” वैभवने आल्याआल्याचं सागितलं. तिथे आम्ही जमेल तशी कामं वाटून घेतली, बाकीचे निव्वळ गप्पा मारत होते . मी वैभवला अपूर्वचं ब्लड सँपल घ्यायला मदत केली, त्यावेळी वैभव मला त्यासंदर्भातल्या मेडीकलच्या बाबी सांगण्याचा प्रयत्न करत होता. नंतर ते सँपल आम्ही लॅब मध्ये देऊन आलो. तोपर्यंत उमेश आणि मंडळींनी अपूर्वचा एक्स-रे काढला होता. नंतर तिथली सगळीचं कामं व्यवस्थित पार पडली.
अशाप्रकारे अपूर्वच्या स्वाईन-फ्लू प्रकरणामुळे आमचं एक छोटेखानी गेट-टुगेदरचं घडून आलं होत. या सर्व घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रुपची ताकद लक्षात आली, निर्माणची ताकद दिसून आली. हा सर्व माणसं जोडून ठेवण्याचा “फ़ायदा”!!!
आर्थिक स्थिती चांगली असताना आपण भविष्यकालीन अडचणींसाठी म्युचुअल फंड, LIC च्या विविध इनश्योरन्स योजनांमध्ये पैसे गुंतवूण ठेवतो. या पैश्याच्या गुंतवणुकीइतकीच किंवा त्याहून अधिक महत्त्वाची असते ती स्नेहसंबंधाची गुंतवणूक. ही निस्वार्थ हेतूने माणसांमध्ये केलेली गुंतवणूकचं इन्श्योर करते आपला वर्तमान व भविष्यकालीन आनंद आणि आपल्याला वारंवार उपलब्ध करून देते निखळ हसण्याच्या व आनंदाच्या संधी!!!
आर्थिक स्थिती चांगली असताना आपण भविष्यकालीन अडचणींसाठी म्युचुअल फंड, LIC च्या विविध इनश्योरन्स योजनांमध्ये पैसे गुंतवूण ठेवतो. या पैश्याच्या गुंतवणुकीइतकीच किंवा त्याहून अधिक महत्त्वाची असते ती स्नेहसंबंधाची गुंतवणूक. ही निस्वार्थ हेतूने माणसांमध्ये केलेली गुंतवणूकचं इन्श्योर करते आपला वर्तमान व भविष्यकालीन आनंद आणि आपल्याला वारंवार उपलब्ध करून देते निखळ हसण्याच्या व आनंदाच्या संधी!!!
No comments:
Post a Comment